NEET Exam :आता कोणत्याही वयात होता येणार डाॅक्टर - राष्ट्रीय वैद्यकीय आयोग
डाॅक्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची (NEET Exam) वयोमर्यादा संपवण्याचा महत्वाचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) घेतला आहे. या निर्णयामुळे आता पात्र उमेदवारांना कोणत्याही वयात डाॅक्टर होण्याची (Now you can be a doctor at any age) संधी उपलब्द होणार आहे.
नीट परीक्षा
नवी दिल्ली:वैद्यकीय शिक्षणासाठीची पात्रता ठरवण्यासाठी 12 वीच्या विद्यार्थ्यांना नीट ही परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण व्हावी लागते. मेरीट नुसार मग त्यांचा वेैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. मात्र आत्ता पर्यंत या परीक्षेसाठी वयोमर्यांदेची अट होती. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने पदवीधर वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत होणाऱ्या या परीक्षेला बसण्यासाठीची उच्च वयोमर्यांदा संपवली आहे. या निर्णयामुळे आता कोणत्याही वयात डाॅक्टर होण्याची संधी उपलब्द होणार आहे.