महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Hardik Patel : हार्दिक पटेल 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता.. लवकरच मोदी-शहा यांची घेणार भेट - हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

काँग्रेसचा राजीनामा दिलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करू ( Hardik Patel likely to join BJP ) शकतात. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर जाणार ( PM Modi Gujrat Visit ) आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पटेल यावेळी पंतप्रधान मोदींना भेटू शकतात.

Hardik patel
हार्दिक पटेल

By

Published : May 25, 2022, 8:46 AM IST

अहमदाबाद ( गुजरात ) : गुजरात काँग्रेसचा राजीनामा देऊन हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करू ( Hardik Patel likely to join BJP ) शकतात. भाजप नेतृत्वाने हार्दिक पटेलला पक्षात समाविष्ट करण्यास औपचारिक मान्यता दिल्याचे वृत्त आहे. 30 मे रोजी हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. याआधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi Gujrat Visit Photos ) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहेत.

त्यानंतर ते औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यात हार्दिक पटेल भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर केली टीका :गुजरातचे युवा पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी 18 मे रोजी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यांनी सोशल मीडियावर राजीनामा पत्रही पोस्ट केले होते. ज्यामध्ये त्यांनी गुजरात काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. त्याचवेळी ते म्हणाले होते की, काँग्रेसची हीच स्थिती राहिली तर गुजरातमध्ये काँग्रेस कधीच सरकार स्थापन करू शकणार नाही.

वर्षाअखेर निवडणुका :गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्यास गुजरातमध्ये दीर्घकाळ सत्तेत परतण्यासाठी झगडणाऱ्या काँग्रेसला निश्चितच धक्का बसेल.

हेही वाचा : गुजरात मॉडेल फेल झालेय - हार्दिक पटेलांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details