मुंबई : आता खेडे आणि छोट्या शहरांतील नागरिकांनाही औषधांची चिंता करावी लागणार नाही. त्यांना फक्त एटीएममध्ये जावे लागणार आहे. कारण, आता एटीएममध्येच औषधं मिळणार आहेत. औषध एटीएम मशीन देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये बसवल्या जाणार आहेत. यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरने (CSC) आंध्र प्रदेश सरकारच्या AMTZ कंपनीशी करार केला आहे. संजीवनी केंद्रे आधीच CSC च्या ब्लॉक स्तरावर चालू आहेत. या केंद्रांवर औषधे वितरीत करणारे एटीएम बसवले जातील. गर्भधारणा, कोरोना चाचणीसह इतर अनेक वैद्यकीय उपकरणे देखील या केंद्रांवर ठेवली जातील. CSC च्या ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून त्यांच्या कार्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
CSC द्वारे गावांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर किंवा कॉन्सन्ट्रेटर पुरवले जातील. काही रक्कम भरून त्यांचा वापर केला जाऊ शकतो. चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरीस सर्व ब्लॉकमध्ये औषध एटीएम बसवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. CSC एसपीव्हीचे एमडी दिनेश त्यागी म्हणाले, की गावकरी डॉक्टरांशी आभासी मार्गाने सल्ला घेण्यासाठी आधीच काम करत आहेत.