महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शाहरुख खान, लिओनेल मेस्सीला ग्राहक आयोगाची नोटीस; जाणून घ्या कारण

Notice To Messi Shah Rukh : बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्हा ग्राहक आयोगानं शाहरुख खान आणि लिओलेन मेस्सीला नोटीस बजावली आहे. हे दोघंही 'बायजूस' या कंपनीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. काय आहे हे प्रकरण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

Lionel Messi Shah Rukh Khan
Lionel Messi Shah Rukh Khan

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 3:19 PM IST

मुझफ्फरपूर (बिहार) Notice To Messi Shah Rukh :बिहारमध्ये महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खान यांच्याविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी मुझफ्फरपूर येथील जिल्हा ग्राहक आयोगात १२ जानेवारीला पुढील सुनावणी होईल.

काय आहे प्रकरण : मुझफ्फरपूर जिल्ह्यातील चांदवारा मोहल्ला येथील रहिवासी मोहम्मद शमशाद अहमद यांनी आपल्या मुलांना 'आकाश बायजूस' या शैक्षणिक संस्थेच्या मुझफ्फरपूर शाखेत प्रवेश दिला होता. नावनोंदणीच्या वेळी त्यांनी शुल्क भरलं होतं आणि त्यांच्या मुलांनी संस्थेत जितके दिवस शिक्षण घेतलं त्याची संपूर्ण फी भरली होती. मात्र त्यांचे दोन्ही मुलं संस्थेच्या शैक्षणिबिहारच्कया व्यवस्थेवर असमाधानी होते. त्यामुळे त्यांनी संस्था सोडण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल : यानंतर अहमद यांनी संस्थेला लेखी माहिती दिली आणि त्यांच्या मुलांनी संस्थेत जाणं बंद केलं. मात्र काही दिवसांनंतर त्यांना समजलं की, संस्थेनं त्यांच्या दोन्ही मुलांच्या शैक्षणिक शुल्कासाठी दोन स्वतंत्र कर्ज दिले आहेत. यानंतर त्यांनी संस्थेकडे तक्रार केली होती. परंतु संस्थेनं हे प्रकरण निकाली काढलं नाही. त्यानंतर अहमद यांनी ३० ऑक्टोबर रोजी जिल्हा ग्राहक आयोगासमोर मानवाधिकार अधिवक्ता एस.के.झा यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. त्यावर आयोगाचे अध्यक्ष पियुष कमल दीक्षित, सदस्य सुनील कुमार तिवारी आणि श्रीमती अनुसूया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

तर मेस्सी, शाहरुखवर कारवाई होईल : यानंतर चित्रपट अभिनेता शाहरुख खान, फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह एकूण सात विरोधी पक्षांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. सर्व विरोधी पक्षांना १२ जानेवारीला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अधिवक्ता एसके झा म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण सेवेतील कमतरता आणि ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत बनावट जाहिरातींशी संबंधित आहे. हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या विरोधात येते. चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हे बायजूसचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्यानं त्यांनाही विरोधी पक्ष बनवण्यात आलंय. आयोगानं ठरवून दिलेल्या तारखेला हे लोक हजर राहिले नाहीत, तर आयोग त्यांच्यावर पुढील कारवाई करेल.

हेही वाचा :

  1. तीस लाख रुपयाच्या मागणीचा पुरावाच नाही, सीबीआय न्यायालयानं पत्रकाराची केली निर्दोष मुक्तता

ABOUT THE AUTHOR

...view details