सूरत : भाऊ आणि बहिणीमधील अपार प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन ( Raksha Bandhan ) . या पवित्र सणाला एक बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसेच दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते. मग या रक्षाबंधनाच्या ( Raksha Bandhan ) दिवशी भाऊ-बहिणीच्या प्रेमाची एक अद्भुत कहाणी सुरतमधून ( Surat ) समोर आली आहे. सुरतमध्ये अशा अनेक बहिणी आहेत की, राखी बांधल्यानंतर भावाचे मनगट गळून पडते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण सुरतच्या चिराग दोषीला ( Chirag Doshi ) 20, 50 किंवा 100 नाही तर तब्बल 1 हजार 540 बहिणी आहेत.
एक आठवडा रक्षाबंधन -रक्षाबंधन हे एक दिवसाचे असते पण, सुरतमधील चिराग दोषी हे एक आठवडा रक्षाबंधन साजरे करतात. कारण त्याला एवढ्या बहिणी आहेत की, फक्त रक्षाबंधनाच्या ( sisters on Raksha Bandhan ) निमित्ताने त्या सगळ्यांना जाऊन राखी बांधणे त्याला शक्य नाही. त्यांना 1हजार 540 बहिणी आहेत. दरवर्षी त्यांच्या बहिणींची संख्या वाढत आहे. चिराग दोषी त्यांच्या सर्व बहिणींची काळजी घेतात. प्रत्येक त्यांना भेटायलाही जातात. विशेषत: रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व बहिणींना राखी आणि मिठाई घेऊन जातात.