उधमपूर (ज.का) -कारगील युद्धातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ भारतीय सेनेने 400 कि.मी ची दुचाकी रॅली काढली आहे. उत्तर आर्मी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडींग इन चीफ योगेश कुमार यांनी गुरुवारी उधमपूर ते कारगिल पर्यंत दुचाकी रॅलीचे नेतृत्व केले.
भारतीय सैन्यातील शूर सैनिकांनी केलेल्या बलिदानाला लक्षात ठेवले जात आहे. जेणेकरून देशातील आजच्या आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया जनरल ऑफिसर कमांडिंग इन-चीफ, उत्तर कमांड आणि कारगिल युद्धाचे हिरो लेफ्टनंट जनरल योगेश कुमार यांनी दिली.
हेही वाचा -कर्नाटकात नेतृत्व बदलाची शक्यता; बीएस येडीयुरप्पा यांच मुख्यमंत्री पद जाणार?
दुचाकी रॅलीच्या माध्यमातून ऑपरेशन विजयदरम्यान हुतात्मा झालेल्या सैनिकांचे स्मरण करणे, तसेच तरुणांमध्ये देशभक्तीची भावना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आहे, असे योगेश कुमार म्हणाले. 7 जुलैला मी एका सुखोईने बत्रा टॉपवरू उड्डाण केले होते. त्या दिवशी माझा एक कंपनी कमांडर कॅप्टन विक्रम बत्रा हा देशासाठी हुतात्मा झाला होता, अशी आठवणही कुमार यांनी यावेळी सांगितली.
या प्रसंगी लेफ्टिनंट जनरल जोशी यांनीही तरुणांना संदेश दिला. जनरल जोशी यांची बटालियन 13 जम्मू आणि काश्मीर राईफल्सने 1999 सालच्या संघर्षादरम्यान पाकिस्तानने ताब्यात घेतल्या पहाडांवर हल्ले केले होते आणि युद्धात महत्वाची कामगिरी बजावली होती.