कोरिया :उत्तर कोरियाने मंगळवारी एक मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला जो जपानवरून जात असताना पॅसिफिक महासागरात कोसळला. ( Ballistic Missile Passes Over Japan ) जपान आणि दक्षिण कोरियाने ही माहिती दिली. उत्तर कोरियाने या भागातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना लक्ष्य करणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या चाचण्या तीव्र केल्याचे समजते. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, उत्तर कोरियाने डागलेले किमान एक क्षेपणास्त्र जपानमधून जात असताना पॅसिफिक महासागरात पडण्याची शक्यता होती
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी चर्चा : जपानी अधिकाऱ्यांनी ईशान्येकडील रहिवाशांना जवळपासच्या इमारती रिकामी करण्यासाठी 'जे-अलर्ट' जारी केला आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच असा 'अलर्ट' जारी करण्यात आला आहे. जपानच्या होक्काइडो आणि आओमोरी भागातील रेल्वे सेवा, ज्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या, आता पूर्ववत करण्यात आल्या आहेत. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा ( Japanche Pant President Fumio Kishida ) यांनी पत्रकारांना सांगितले की, उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या चाचण्यांचा आपण तीव्र निषेध करतो. या परिस्थितीबाबत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जपानच्या मंत्रिमंडळाचे मुख्य सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले की, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.