नवी दिल्ली : चित्रपट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेक तास चौकशी केली. २०० कोटींहून अधिक रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दोघींची चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान दोघींचा सामना सुकेश चंद्रशेखरची सहाय्यक पिंकी इराणीशी झाला. पिंकी इराणीशी समोरासमोर प्रश्नोत्तरे झाल्याने दोघींमध्ये कडाक्याचे भांडण ( Nora and Jacqueline started quarreling ) झाले. भांडण इतके वाढले की हाणामारीची वेळ आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही अभिनेत्रींनी पिंकी इराणीवर आरोप केले आणि जोरजोरात भांडण सुरू केले. या दोन्ही अभिनेत्रींनी पिंकी इराणी हीच त्यांच्या गुन्ह्यामागे कारण असल्याचे सांगितले. यादरम्यान दोन्ही अभिनेत्री आणि पिंकी इराणी यांच्यात दिल्ली पोलिसांना अनेकवेळा हस्तक्षेप करावा लागला.
चौकशी दरम्यान अभिनेत्री अस्वस्थ -बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीनफर्नांडिस यांच्यावर बुधवारी आणि गुरुवारी पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रींनी इतक्या लांबलचक तपास प्रक्रियेत याआधी कधीच भाग घेतलेला नव्हता. त्यामुळे त्या अस्वस्थ दिसत होत्या. यादरम्यान पोलिसांनी अनेकवेळा चौकशीला ब्रेक दिला आणि दिल्लीतील नामांकित रेस्टॉरंटमधून त्यांच्यासाठी नाश्ता मागवला. जामीन मिळवण्याच्या बहाण्याने पत्नीची २०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणारा तिहार तुरुंगातील रॅनबॅक्सीचा माजी प्रवर्तक सुकेश चंद्रशेखर, चित्रपट अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे. आपल्यावर पैसा उधळणारा सुकेश चंद्रशेखर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे हे या दोन्ही अभिनेत्रींना माहीत नव्हते. मात्र, जेव्हा त्यांना वास्तव कळले तेव्हा त्याच्यापासून त्या दूर गेल्या. प्रथम, सुकेशने नोराचा मेहुणा बॉबी मार्फत त्यांना बीएमडब्ल्यू कार दिली. महागडे मोबाईल आदी भेटवस्तू देऊन जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण लवकरच नोराला सुकेशबद्दल कळाले, त्यानंतर ती सुकेश चंद्रशेखरपासून लांब गेली. नोराशी मैत्री न झाल्याने सुकेशने जॅकलीनवर पैशांची उधळपट्टी सुरू केली. तिलाही त्याचा फटका बसला.