महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Punjab Polls 2022 : पंजाब निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात; 'ही' आहे शेवटची तारीख - पंजाब विधानसभा निवडणूक

आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ( Panjab Assembly Election 2022 ) आज उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली (Nomination Filing Start For Panjab Assembly Election ) आहे. मात्र, 26 आणि 30 जानेवारीला सार्वजनिक सुट्ट्या असतील, त्यामुळे उमेदवार सुट्टीच्या काळात ऑनलाइनही नामनिर्देशनपत्र दाखल करू शकणार आहेत.

panjab
panjab

By

Published : Jan 25, 2022, 5:22 PM IST

चंदीगड -आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ( Panjab Assembly Election 2022 ) आज उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली (Nomination Filing Start For Panjab Assembly Election ) आहे. मात्र, 26 आणि 30 जानेवारीला सार्वजनिक सुट्ट्या असतील, त्यामुळे उमेदवार सुट्टीच्या काळात ऑनलाइनही नामनिर्देशनपत्र दाखल करू शकणार आहे. फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी ( Panjab Election Nomination Last Date ) असेल. 2 फेब्रुवारीला अर्जांची छाननी होणार असून 4 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान ( Panjab Election Voting Date ) होणार असून 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत.

या तारखेला होईल निवडणूक -

पंजाबमध्ये निवडणुकांची घोषणा झाली असून 27 मार्च 2022 रोजी पंजाब विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. पंजाबमध्ये 117 जागांवर मतदान होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकता येईल. 29 जानेवारी रोजी अर्जाची पडताळणी होईल. 31 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल. दहा मार्च रोजी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखांसोबतच कोरोना नियमावलीही जारी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details