नवी दिल्ली : Nobel Prize in Physics 2023 : या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अकादमीनं जाहीर केलेल्या घोषणेनुसार, पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि ॲन ल'हुलियर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पदार्थातील इलेक्ट्रॉन डायनॅमिक्सचा अभ्यास आणि प्रकाशाच्या अॅटोसेकंद पल्स निर्माण करण्याच्या प्रायोगिक पद्धतींसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
का दिला जातो नोबेल ? : वर्षभरात मानवतेसाठी अमूल्य कार्य करणाऱ्यांना नोबेल पारितोषिकं दिली जातात. हा पुरस्कार विविध क्षेत्रात दिला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि साहित्य यासारख्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी नोबेल पारितोषिक दिलं जातं. हा पुरस्कार स्वीडिश उद्योगपती, डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो.
कधी झाली नोबेलची सुरवात :आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या कमाईचा बहुतांश भाग नोबेल पुरस्कार निधीला दिलाय. पहिलं नोबेल पारितोषिक 1901 मध्ये देण्यात आलं. दरम्यान, 1968 मध्ये, सेंट्रल बँक ऑफ स्वीडननं पुरस्कारांमध्ये आणखी एक श्रेणी, इकॉनॉमिक सायन्सेस जोडली आहे. हा जगातील सर्वोच्च दर्जाचा पुरस्कार असल्याचं म्हटलं जातं. अनेक मान्यवरांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
नोबेल पारितोषिक मिळणारे भारतीय :रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांना 1913 साली साहित्यात नोबोल पारितोषिक जाहिर करण्यात आलं होतं.
भारतीय नोबेल विजेते :
रवींद्रनाथ टागोर - 1913 साहित्य
सर चंद्रशेखर व्यंकट उर्फ सी. व्ही. रमण - 1930 भौतिकशास्त्र
हरगोबिंद खुराणा - 1968 औषध