तिरुवनंतपुरम (केरळ) -राज्यात कोरोना प्रकरणात वाढ होत आहे. मात्र तरीही राज्यात आठवडी लॉकडाऊन लावले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोविड-कोअर समितीच्या बैठकीत यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. आढावा बैठका घेतल्या असून सध्या शनिवार व रविवार लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची मागणी करण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. दरम्यान राज्यात आजपासून नाइट कर्फ्यू लावला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नाईट कर्फ्यू रात्री नऊ ते पहाटे ५ वाजेपर्यंत दोन आठवड्यांसाठी लावण्यात आला आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असेल तेथे कोविड चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात घरोघरी जाऊन नागरिकांच्या चाचण्या करण्यात येणार आहे.