हैदराबाद No School to Founders Lab : चांगले पैसे कमावता येतील म्हणून तरुण परदेशात जात आहेत, असं झालं तर देशाचं भवितव्य आणि अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल, असा कासारगडा शकुंतलाचा विचार होता. स्टार्ट-अप्सच्या दिशेनं विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देणं, तरुण उद्योजक घडवणाऱ्या ज्यांनी अभ्यासासाठी खूप संघर्ष केला त्या शकुंतला कासारगडा यांनी 'एकेकाळी शाळेत न जाता फाउंडर्स लॅबची स्थापना कशी केली, यावर 'ईटीव्ही भारत'शी त्यांनी सविस्तर बातचित केली.
वडिलांच्या निधनानंतर शाळेत प्रवेश : शकुंतला कासारगडा म्हणाल्या, 'मुलीनं काबाडकष्ट करु नये, अशी घरात भावना असते. त्यामुळं मी घरी माझ्या मोठ्या भावाच्या पुस्तकांतून अभ्यास केला. मी 12 वर्षांची असताना माझे वडील सत्यनारायण यांचं निधन झालं. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी मला शाळेत पाठवण्यास होकार दिला. मी दहावीपर्यंत सरकारी शाळेत शिकले. यानंतर पुढील शिक्षणाची गरज का आहे, असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला. उपस्थितीबाबत सूट मिळाल्यानंतर मी इंटरमिजिएट आणि बीए समाजशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. नंतर माझा हट्ट बघून घरातील सदस्यांनी मला पाठिंबा दिल्यावर मी उस्मानिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
मौलाअली इथं सामुदायिक शाळा : शकुंतला पुढे म्हणाल्या, 'मी ही सनदी अधिकाऱ्यांसाठीच्या परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेले होते. पण आमच्या सोबत असलेले आजोबा वारले आणि मला नोकरी करावी लागली. त्यानंतर मला टाटा ट्रस्टकडून 2 लाख रुपयांची फेलोशिपही मिळाली. मात्र ज्यांना ती मिळते त्यांना तीन वर्षे ग्रामविकास कार्यक्रमात काम करावं लागतं. त्यामुळं मदुराई येथील 'डॉन फाऊंडेशन' मध्ये सहभागी झाले. क्षेत्रीय स्तरावरच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणण्याचं काम करत होते. त्यानंतर मी हैदराबादला आले. कारण तिची सेवा तेलुगू राज्यांमध्येही उपलब्ध होती. माझ्या नेतृत्वाखाली मौलाअली इथं सामुदायिक शाळा उघडली आणि त्याला सरकारी मान्यता मिळाली हे मी विसरू शकत नाही.