नवी दिल्ली - ब्रिटन सरकारने कोरोना लस पात्र असलेल्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश केला आहे. त्यामुळे कोव्हिशिल्डचे दोन्ही लस घेतलेल्या भारतीयांना इंग्लंडमध्ये गेल्यानंतर क्वारंटाईन व्हावे लागणार नाही.
भारत, पाकिस्तानसह ३७ देशांमधील पात्र प्रवाशांनी लशींचे पूर्ण डोस घेतल्यानंतर त्यांना ब्रिटनच्या लस घेतलेल्या नागरिकांप्रमाणेच नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कोव्हिश्लड लशींचे पूर्ण डोस घेतलेल्या भारतीयांना ब्रिटनमध्ये गेल्यास क्वारंटाईन होण्याची गरज भासणार नाही. याबाबतचे आदेश इंग्लंडच्या वाहतूक विभागाने काढले आहे. या निर्णयाची माहिती भारतामधील ब्रिटीश राजदूत उच्चायुक्त कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
हेही वाचा-‘कोव्हिशिल्ड’च्या 2 डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांनी वाढवलं
अदार पुनावाला यांनी मानले आभार
या निर्णयावर सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी ट्विट करत ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. दोन्ही देशांमध्ये दृढ संबंध असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. जर तुम्ही कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतले असल्यास तुम्हाला 11 ऑक्टोबरनंतर क्वारंटाईनची गरज लागणार नाही, असे पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-कोव्हिशिल्ड घेऊनही आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यातील अडथळा; पुनावाला यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया
भारताने नुकतेच दिले होते जशास तसे उत्तर
इंग्लंडमध्ये जाणाऱ्या भारतीयांना लस घेऊनही क्वारंटाईनव्हावे लागत असल्याने भारताने नाराजी व्यक्त केली होती. तरीही ब्रिटनकडून नियमात बदल करण्यात आला नव्हता. त्यावर भारत सरकारने जशास तसे उत्तर देत इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या नागरिकांनाही क्वारंटाईनचा नियम लागू केला होता.
संबंधित बातमी वाचा-कोव्हिशिल्ड घेऊन परेदशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 कोटीचा निधी; असा करा अर्ज