महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Coal Shortage In Delhi : राजधानी दिल्लीतच भारनियमनाचे संकट.. वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा संपला.. - Coal Demand In Delhi

दिल्ली सरकारचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन ( Delhi Energy Minister Satyendra Jain ) यांनी केंद्र सरकारला कोळसा संकटाचा ( Coal Crisis In Delhi ) इशारा दिला असून, वीज प्रकल्पांसाठी कोळशाची मागणी केली ( Coal Demand In Delhi ) आहे. एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना सत्येंद्र जैन म्हणाले की, संपूर्ण देशात कोळशाचा तुटवडा ( Coal Shortage In Delhi ) आहे. दिल्लीत वीज संकटाची शक्यता असल्याबाबत प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, कोळसा संपल्यास आमच्याकडे विजेचा कोणताही बॅकअप नाही.

Energy Minister Satyendra Jain
ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन

By

Published : Apr 29, 2022, 7:18 PM IST

नवी दिल्ली :दिल्ली सरकारचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन ( Delhi Energy Minister Satyendra Jain ) यांनी केंद्र सरकारला कोळसा संकटाचा इशारा दिला ( Coal Crisis In Delhi ) आहे. वीज प्रकल्पांसाठी कोळशाची मागणी केली ( Coal Demand In Delhi ) आहे. एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना सत्येंद्र जैन म्हणाले की, संपूर्ण देशात कोळशाचा तुटवडा ( Coal Shortage In Delhi ) आहे. दिल्लीत वीज संकटाची शक्यता असताना प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, आमच्याकडे विजेचा कोणताही बॅकअप नाही. त्यामुळे देशाच्या राजधानीतच भारनियमनाचे संकट उभे राहिले आहे.

पॉवर प्लांट्समध्ये २१ दिवसांचा अतिरिक्त कोळसा असावा, पण तो सध्या नाही. दिल्लीला जवळपासच्या अनेक प्लांटमधून वीज पुरवठा केला जातो. ज्यामध्ये दादरी पॉवर प्लांटमधून मोठ्या प्रमाणावर वीज मिळते. या सर्व पॉवर प्लांटमध्ये वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा नाही. याबाबत केंद्र सरकारला पत्रही लिहिले आहे. वीजनिर्मिती केंद्रे सुरळीत चालण्यासाठी २१ दिवसांचा कोळसा असायला हवा, मात्र सध्या वीजनिर्मिती केंद्रांमध्ये केवळ १ दिवसाचा कोळसा शिल्लक आहे.

ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन

देशातील खाणींमधून लवकरात लवकर कोळसा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच रेल्वेच्या त्रुटींकडे लक्ष वेधत ते म्हणाले की, रेक वाढण्याऐवजी कमी केले आहेत. त्यामुळे वीज युनिटलाही कोळसा पुरवठा केला जात नाही.

हेही वाचा : राज्यासमोर भारनियमनाचे संकट.. कोयनेतून होणारी वीजनिर्मिती बंद

ABOUT THE AUTHOR

...view details