नवी दिल्ली - टेस्लाची इलेक्ट्रिक कार (Tesla Electric Car) गे ल्या वर्षभरापासून भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी टेस्लाकडून प्रयत्न सुरु होते. पण आता टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत आणण्याचा निर्णय एलॉन मस्क यांनी स्थगित केला आहे. भारत जोपर्यंत टेस्लाने बनवलेल्या कार भारतात विकण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत भारतात कार बनवणार नसल्याचं सांगितलं आहे. मस्क यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली.
भारत सरकारची टेस्लाला अट - टेस्ला कंपनी भारतात तयार केलेल्या इलेक्ट्रिक कारचं भारतात विकू शकेल अशी सरकारची भूमिका आहे. पण टेस्लाने चीनमध्ये तयार केलेल्या कार भारतात विकून भारतीय बाजारपेठेचा अंदाज घ्यायचा असल्याचे म्हटले आहे. यामुळे भारत सरकार आणि टेस्ला यांच्यात बऱ्याच काळापासून प्रस्ताव रखडला आहे.