नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. पंजाब, हरयाणा उत्तरप्रदेशसह विविध राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच सुरू केली आहे. 'चलो दिल्ली'चा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली नसून गरज पडल्यास कारवाई करणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. उद्या (गुरुवार) २६ नोव्हेंबरला आंदोलक शेतकरी दिल्लीत पोहचणार असून कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
'शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये'
दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असून हरणाया सरकारने हरयाणा-पंजाब सीमा बंद केली आहे. 'डीडीएमए नियमावलीनुसार शहरात आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. २६-२७ तारखेला आंदोलन होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये अशी आम्ही त्यांना आवाहन करतो. मात्र, जर त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले तर आम्हाला कारवाई करावी लागले, असे नवी दिल्लीचे पोलीस उपआयुक्त इश सिंघल यांनी सांगितले.