नवी दिल्ली:पत्रकारांशी बोलतानासंजय राऊत म्हणाले की, हा चित्रपट अजिबात वादात सापडलेला नाही. लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्यात आले तसाच या चित्रपटाचा अजेंडा आहे. मोदी स्वतः त्या चित्रपटाचे प्रचारक आहेत. ३२ वर्षापूर्वीचा आक्रोश, वेदना हे सर्व दाखवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याचे कौतुक केले पाहिजे. पण या चित्रपटात अनेक सत्ये दडवली गेली आहेत. काश्मीरची वेदना जेवढी शिवसेनेला माहिती असेल तेवढी इतर कोणला माहिती असेल असे मला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी काश्मिरी पंडितांच्या वेदनेवर देशात आवाज उठवला. युती सरकारच्या काळात काश्मिरी पंडितांचे शिष्ठमंडळ बाळासाहेबांना भेटायला आले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी जाहीरपणे काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या असे सांगितले होते. त्या शिष्ठमंडळाने शिक्षणासाठी राखीव जागा मागितल्या होत्या. बाळासाहेबांनी त्यावेळी काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी महाराष्ट्रात वैद्यकीय आणि इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी पाच टक्के राखीव जागा ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे काश्मीरची खरी फाईल काय आहे हे आम्हाला माहिती आहे,
राऊतांनी आज पुन्हा राज्यपाल भगतसींग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला. राज्यपालांकडून अपेक्षा नाही. ते राजकारण करत आहेत. ते ज्या पक्षातून आले त्या पक्षाच्या दबावामुळे ते राजकारण करत आहेत. त्यांच्या पक्षाने आणि राज्यपालांनी हा संघर्ष वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवला. इतिहासात त्याची काळ्या अक्षराने नोंद होईल. घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणं हे आणिबाणीची आठवण करून देणारे आहे.