नवी दिल्ली -काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी कोरोनाचा वाढता संसर्ग, लसीचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून केंद्र सरकारवर टीका केली. देशात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. सरकारला त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच सीबीएसई बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत फेरविचार करायला हवा, असेही ते आणखी एक टि्वट करून म्हटलं. सीबीएसईच्या लेखी परीक्षांना 4 मेपासून सुरुवात होणार आहे.
कोरोनावर नियंत्रण नाही, लसीचा पुरवठा नाही, रोजगार नाही, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, एमएसएमई सुरक्षित नाही, मध्यमवर्गीय समाधानी नाही, असे राहुल गांधी टि्वटमध्ये म्हणाले. तसेच आंबा खाणे ठिक होते. मात्र, सामान्य नागरिकांना तरी सोडायचे, अशी उपहासात्मक टीका राहुल गांधींनी केली. अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची एप्रिल 2019 मध्ये मुलाखत घेतली होती. त्यात आपल्याला आंबे खाण्याची आवड असल्याचे त्यांनी सांगितले होते. अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गैर राजकीय प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी या मुलाखतीवर टीका केली होती. याचाच संदर्भ घेत राहुल गांधींनी टीका केल्याचे बोलले जात आहे.
सीबीएसई बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत फेरविचार करायला हवा, असेही आज राहुल गांधी म्हणाले. तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहून सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.
अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अॅलर्जी -