महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

No Confidence Motion : सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक; मणिपूर, शेतकरी मुद्द्यांवरुन सरकारला धरले धारेवर - काँग्रेस खासदार गौरव गोगोई

लोकसभेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भाषण केले आहे. राष्ट्रवादीचा या प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे ठामपणे त्यांनी यावेळी सांगितले. सोबतच त्यांनी सरकारला 'शेतकरीविरोधी' म्हणून संबोधले आहे. तसेच त्यांनी मणिपूर हिंसाचारावरही भाष्य केले आहे.

MP SUPRIYA SULE
खासदार सुप्रिया सुळे

By

Published : Aug 8, 2023, 4:10 PM IST

Updated : Aug 8, 2023, 4:33 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मणिपूरमध्ये 170 लोकांचा बळी गेला आहे. याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी विद्यमान सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. यावर सध्या लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे.

मणिपूर हिंसाचाराला केंद्र जबाबदार - सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मणिपूरमध्ये राज्य सरकारच्या लाजिरवाण्या चुका झाल्या आहेत. हिंसाचारात 170 लोक मरण पावले आहेत. दंगल, खून, बलात्कारासारख्या 10 हजारावर घटना घडल्या आहेत. आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का? या सरकारसोबत हीच समस्या आहे. हे सांगताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे एकमेव लक्ष हे 2024 च्या लोकसभा निवडणुका या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकार शेतकरीविरोधी - मी येथे 'इंडिया' या आघाडीसोबत उभी आहे. सध्याचे सरकार हे देशातील गरीब त्याचप्रमाणे प्रामाणिक जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही सुप्रिया सुळेंनी केली. तसेच हे सरकार शेतकरीविरोधी आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे आश्वासन दिले होते. कोणत्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले ते सरकारने स्पष्ट करावे. कांदा, दूध उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे, अशी टीका करताना केंद्रात भाजपाची सत्ता आल्यापासून देश आर्थिक क्षेत्रासह सर्वच आघाड्यांवर खाली गेल्याची टीका सुळेंनी केली आहे.

मोदी सरकारवर टीका - 'वंदे भारत' या सेमी-हाय स्पीड गाड्या सुरू केल्याबद्दलही सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केली. या गाड्यांचा काय उपयोग? त्या फक्त लोकांना पाहायला ठेवल्या आहेत का? असे विचारत या गाड्यांचे थांबे वाढवावे, अशी आमची मागणी आहे. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी तक्रार करताना त्यांनी सांगितले की, 'गरीब रथ' गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्या गरीबांसाठी होत्या. त्यात वाढ केली असती तर गरीबांना त्याचा फायदा झाला असता, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा

  1. Parliament Monsoon Session 2023 Updates: सोनियांचे दोन टास्क, मुलगा सेट करणे आणि जावयाला भेट देणे, निशिकांत दुबेंचा हल्ला
  2. MONSOON SESSION 2023 : टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन उर्वरित पावसाळी अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित
Last Updated : Aug 8, 2023, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details