नवी दिल्ली- खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी प्रथमच संसदेत आले आहेत. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, आज मी तुमच्यावर टीका करणार नाही. आज 'दिमाग से नही दिल से' भाषण करणार आहे. भारत जोडो यात्रा संपलेली नाही. लडाखलाही जाणार आहे. सत्ताधाऱ्यांना घाबरणार नाही. मी अदानींवर बोलल्याने काही जणांना त्रास होतो.
- देशात अनेक विकासकामे झाली आहेत. त्यावर काँग्रेसला चर्चा करायची नाही. राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये महिलांवर अत्याचार झाले आहेत. आम्ही शौचालयवर बोलतो, तेव्हा काँग्रेसचे खासदार हसतात. काँग्रेसचे अनेक गोष्टींवर मौन असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली आहे.
- काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवर अत्याचार झाला. काश्मीर पंडितांचा काँग्रेसने कधी आवाज ऐकला नाही. गांधी कुटुंबासाठी भारत म्हणजे उत्तर भारत आहे. गिरीजा टिक्कू व सरला बटला यांना कधी न्याय मिळणार? भारत मातेची हत्या म्हटल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी टेबल वाजविले हे निषेधार्ह आहे, असे केंद्रीय मंत्री इराणी यांनी म्हटले आहे.
- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या राहुल गांधींच्या भाषणावर उत्तर देत आहेत. आता माझा ऐकण्याचे धैर्य ठेवा. तुम्ही भारत नाही, हे लक्षात ठेवा. मणिपूरचे विभाजन झाले नसून देशाचा भाग आहे. टाळी वाजविणाऱ्या काँग्रेसच्या मनात गद्दारी आहे. गांधी घराण्यात हिंमत असेल तर काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचे काँग्रेस नेत्याचे वक्तव्य का, हे सांगावे.
- रामाने रावणाला मारले नाही. तर अंहकाराने पेटविले आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे.
- राहुल गांधी यांनी माफी मागावी, असे किरण रिजीजू यांनी मागणी केली आहे. दहशतवाद हे काँग्रेसचे पाप असल्याचे म्हटले आहे.
- तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून भारतमातेची मणिपूरमध्ये हत्या केली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तुम्ही देशद्रोही आहात, देशप्रेमी नाही, असे गांधी यांनी म्हटले आहे.
- राहुल गांधी यांनी हल्लाबोल करताच भाजपचे खासदार आक्रमक झाले आहेत. सभागृहात मोठा गदारोळ सुरू आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी सभागृहात शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.
- पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत. मात्र, मी मणिपूरला गेलो. मणिपूर आता राहिलेले नाही. तुम्ही दोन भागामध्ये मणिपूरची विभागणी केली आहे. मणिपूरमधील मदत छावणीमध्ये मुलांशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींसाठी मणिपूर हा भारत नाही. त्यांना मणिपूरच्या जनतेशी चर्चा करण्यासाठी वेळ नाही, असा टोला राहुल यांनी मोदींना लगावला.
- मणिपूरवर तुम्ही खोटे बोलत आहात. मी खोटे बोलत नाही, असे सांगत राहुल गांधींना सरकारवर हल्लाबोल केला आहे.
- एक आई आपल्या मुलाच्या मृतदेहासोबत असल्याचे मणिपूरमध्ये पाहिले. मुलाला डोळ्यादाखत जवळून गोळी मारल्याचे त्या आईने सांगितले. ही घटना सांगताना महिला बेशुद्ध पडली. महिला व मुलांनी दु:ख माझ्यासमोर व्यक्त केले. दुसऱ्या कॅम्पमधील महिला भीतीने थरथर कापत होती. मोदी सरकारने मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली आहे.
- यात्रेदरम्यान अनेक घटकांशी संवाद साधता आला आहे. चालताना त्रास व्हायचा, पण कोणती तरी शक्ती मदत करायची. शेतकऱ्यांच्या ह्रदयातील दु:ख मला कळाले. भारत जोडो यात्रेदरम्यान शेतकऱ्यांनी आपले दु:ख मांडली आहे. एका शेतकऱ्याने विमा मिळाला नसल्याचे सांगितले. त्याने कापसाचे बंडल केवळ उरल्याचे सांगितले. शेतकऱ्याची भूक आंदोलनादरम्यान कळाली.
पंतप्रधान हे रावणाप्रमाणे केवळ दोन लोकांचे ऐकतात. अमित शाह व अदानी यांचे केवळ मोदी ऐकतात. तुम्ही संपूर्ण देशात रॉकेल होत आहात. मणिपूरमध्ये माझ्या आईची हत्या झाली आहे-राहुल गांधी