नवी दिल्ली : नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड - इसाक मुइवा (NSCN-IM) (National Socialist Council of Nagaland) ने भारत सरकारसोबत नागा राष्ट्रीय ध्वजाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करण्याच्या आपल्या कठोर भूमिकेची पुनरावृत्ती केली आहे. "नागा राष्ट्रीय ध्वजाचे नागा लोकांमध्ये खूप भावनिक मूल्य आहे. हा ध्वज 'देवाने दिलेला इतिहास' असून तो नागा लोकांची ओळख आहे," असे एनएससीएन-आयएमने त्यांचे मासिक मुखपत्र, 'नागलिम व्हॉईस'च्या (Nagalim Voice) नोव्हेंबर अंकात म्हटले आहे.
Naga National Flag : नागा राष्ट्रध्वजावर कोणतीही तडजोड नाही, फुटीरतावाद्यांची भूमिका - नागलिम व्हॉईस
एनएससीएन-आयएमचे (National Socialist Council of Nagaland) वर्चस्व असलेल्या केंद्र सरकार आणि नागा गटांमधील चर्चेच्या 80 हून अधिक फेऱ्यांनंतर, स्वतंत्र नागा ध्वज आणि संविधानाच्या वादग्रस्त मुद्द्यांवर अद्यापही वाद कायम आहे. (No Compromise on Naga National Flag).

वादाचा वापर राजकारणासाठी करू नये - एनएससीएन-आयएमचे वर्चस्व असलेल्या केंद्र सरकार आणि नागा गटांमधील चर्चेच्या 80 हून अधिक फेऱ्यांनंतर, स्वतंत्र नागा ध्वज आणि संविधानाच्या वादग्रस्त मुद्द्यांवर अद्यापही वाद कायम आहे. 'नागा राष्ट्रीय ध्वजाचे प्रतीक म्हणून एक लोक एक राष्ट्र या तत्त्वाला लक्ष्य केले जात आहे, असे एनएससीएन-आयएमने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे. एनएससीएन-आयएम स्वतंत्र ध्वज आणि राज्यघटनेची मागणी करत आहे, ज्याला माजी सरकारी संवादक आणि तत्कालीन नागालँडचे राज्यपाल आर एन रवी यांनी अनेक वेळा नाकारले होते. मुखपत्रात पुढे म्हटले आहे की, नागा राजकीय प्रश्नाची गुंतागुंत लक्षात घेता, हा प्रश्न 25 वर्षांहून अधिक काळ खेचला गेला हे आश्चर्यकारक नाही. तथापि, या गुंतागुंतीचा वापर कोणत्याही घाणेरड्या राजकारणासाठी केला जाऊ नये, असे मुखपत्राने नमूद केले आहे.