निवार चक्रीवादळ कर्नाटकच्या दिशेने येत आहे. या वादळाचा जोर कमी झाला असला, तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे, हवामान खात्याने कर्नाटकमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे.
निवार चक्रीवादळाचा जोर झाला कमी; आता कर्नाटकच्या दिशेने... - Nivar cyclon update
निवार चक्रीवादळाचा जोर झाला कमी; आता कर्नाटकच्या दिशेने...
10:57 November 27
कर्नाटकमध्ये येलो अलर्ट जारी..
10:53 November 27
निवार चक्रीवादळाचा जोर झाला कमी..
निवार चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असून, ते आंध्र प्रदेश ओलांडत कर्नाटकच्या दिशेने जात असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गुरुवारी या चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडू आणि पद्दुचेरीला बसला होता. तामिळनाडूमध्ये या चक्रीवादळामुळे तिघांचा बळी गेला, तर तीन जण जखमी झाले होते.