महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 9, 2022, 4:13 PM IST

ETV Bharat / bharat

Nitish Kumar resigns : बिहारमध्ये राजकीय भूकंप, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, भाजपसोबतची युतीही तुटली

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला असून, भाजपसोबतची युतीही तुटल्याची घोषणा केली आहे. राज्यपाल फागु चौहान यांची भेट घेत नितीश कुमारांनी राजीनामा सादर केला. ( Nitish Kumar resigns as Chief Minister ) ( Nitish Kumar Breaks Alliance with BJP ) ( Nitish Kumar Meets Bihar Governer )

Nitish Kumar
नितीश कुमार

पाटणा ( बिहार ): बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपची युती तुटली आहे. सर्व अटकळांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान, त्यांनी सरकार स्थापनेचा दावाही केला आहे. उद्याच शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. ( Nitish Kumar resigns as Chief Minister ) ( Nitish Kumar Breaks Alliance with BJP ) ( Nitish Kumar Meets Bihar Governer )

उपेंद्र कुशवाह यांनी ट्विट करून एनडीए युती तुटण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. जेडीयूच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. औपचारिक घोषणेची प्रतीक्षा असली तरी दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले आहेत. राजभवनाबाहेर जेडीयूचे कार्यकर्ते नितीश कुमार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राजभवनाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

सूत्रांवर विश्वास ठेवला तर, बिहारमधील नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे. आज नितीश कुमार राज्यपालांची भेट घेऊन आमदारांना पाठिंब्याचे पत्र सादर करणार आहेत. त्याचबरोबर महाआघाडीच्या बैठकीत नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसने यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असतील.

हेही वाचा :Nitish Kumar Attack On BJP : भाजप धोकेबाज.. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला.. युती तुटल्यावर नितीशकुमारांचा भाजपवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details