महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 1, 2022, 7:26 PM IST

ETV Bharat / bharat

Nitish Kumar On PM Candidate नितीश कुमारांना पत्रकाराने भावी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल विचारले आणि ते हात जोडून हसत म्हणाले...

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) Telangana CM K Chandrashekhar Rao आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार CM Nitish Kumar यांच्या पत्रकार परिषदेचे. जिथे केसीआर यांनी लग्नाच्या 'वरा'चा उल्लेख केला आणि नितीश कुमार मिश्किलपणे हसत राहिले. journalist asked nitish kumar about future prime minister candidate and they reaction

KCR On PM Candidate
केसीआर पंतप्रधान पदाच्या भावी उमेदवाराबद्दल बोलत होते

पाटणा (बिहार) : राजकारणात अनेक वेळा 'नाही'चा अर्थ 'हो' असाही होतो आणि जर कोणी 'नाही' म्हणत नसेल तर त्याचा होकार आहे असे समटजले जाते. असाच प्रकार बुधवारी बिहारच्या राजकारणात पाहायला मिळाला. निमित्त होते तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) Telangana CM K Chandrashekhar Rao आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार CM Nitish Kumar यांच्या पत्रकार परिषदेचे. जिथे नितीश कुमारांना पत्रकाराने भावी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल विचारले आणि ते हात जोडून हसत या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. Nitish Kumar Reaction on future candidate for PM केसीआर म्हणाले, भाजप विरोधी दलांच्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वानुमते याबाबत निर्णय घेतला जाईल. यानंतर याबद्दल काही बोलणे योग्य ठरेल.

नितीश पुन्हा-पुन्हा उठण्याच्या प्रयत्नात होते: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते, तेव्हा नितीश कुमार यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत वारंवार प्रश्न विचारला जात असताना नितीश कुमार उभे राहिले. तेलंगणाचे मुख्यमंत्री त्यांना बसण्याचा आग्रह करत राहिले. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या विनंतीवरून नितीश अर्थातच पुन्हा बसले असले तरी प्रश्नोत्तरांची प्रक्रिया सुरू असताना पुन्हा एकदा ते उभे राहिले.

पंतप्रधान पदाच्या भावी उमेदवारावर केसीआर यांचीही सावध प्रतिक्रिया : खरे तर नितीश कुमार यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर केसीआर म्हणाले की, आता फार घाई नाही. त्यावर येत्या काळात सर्वानुमते निर्णय होईल. या देशात भाजपचे जे काही विरोधी पक्ष आहेत, त्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि या बैठकीत सर्वसहमतीने काय निष्पन्न होईल, हे नक्की सांगू. वराशिवाय लग्नच होत नाही. 'आता काय विचारताय..!' केसीआर या गोष्टींचा उल्लेख करत असताना नितीश कुमार हात जोडून हसत होते. ते म्हणाले की, 'सर्वांबद्दल सांगताना आम्ही सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करू, हे आमचे मत आहे. जे काही करू ते एकत्रितपणे करू. पंतप्रधान पदाच्या भावी उमेदवाराबद्दल आत्ताच बोलणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा CM Shinde Visit Raj Thackeray Dadar मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थीवर पोहोचले

ABOUT THE AUTHOR

...view details