पाटणा (बिहार) - नितीश कुमार यांनी भाजपची साथ ( Nitish kumar on Sushil modi ) सोडत आरजेडीसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर भाजपकडून नितीश यांच्यावर टीकेचे बाण ( Nitish kumar on Sushil modi claim ) सोडले जात आहेत. नितीश कुमार यांना ( Sushil modi claim ) उपराष्ट्रपती पद मिळाले नाही, म्हणून त्यांनी काडीमोड केला, असा दावा राज्याचे ( Sushil modi comment on nitish kumar ) माजी मुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला. त्यावर हा मोठा जोक असून, हे खोटे आहे. माझी अशी इच्छा नव्हती. उलट आम्ही राष्ट्रपती - उपराष्ट्रपती निवडणुकीत जे समर्थन दिले ते भाजप विसरले का? असा प्रश्न नितीश यांनी केला आहे.
हेही वाचा -गुरुग्राममध्ये बाऊन्सर्सची गुंडगिरी महिलेचा विनयभंग तुफान हाणामारी व्हायरल
नितीश कुमार यांनी आरजेडीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांच्यावर आरोप होत आहेत. भाजपकडून विरोध वाढला आहे. अशात नितीश काय प्रतिक्रिय देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर भाजप नेते सुशील मोदी यांचा दावा नितीश यांनी खोडून काढला. उपराष्ट्रपती होण्याची इच्छा आपली नव्हती असे नितीश यांनी स्पष्ट केले. जर त्यांना पद मिळत असेल तर त्यांना माझ्याविरुद्ध बोलू द्या, असेही नितीश कुमार म्हणाले.
भाई 2 दिन तक रूक जाओ, फिर.. -बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. जेडीयूचे नेते तथा ( jdu national president lalan singh claim ) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड करून लालू प्रसाद यादव ( JDU new claim ) यांच्या आरजेडीशी हातमिळवणी केली. यामुळे राज्यातील भाजप ( bjp tried to pressure RJD claim lalan singh ) पक्षात मोठी नाराजी आणि संतापाची लाट पसरली आहे. भाजपकडून आता नितीश कुमार यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहे. नितीश यांनी केलेले कृत्य हे नवे नाही. या अगोदरही त्यांनी आरजेडीशी युती केली होती. मात्र, नंतर त्यांनी ती सोडून पुन्हा भाजपचा पदर पकडला. मात्र, यंदा नितीश यांनी ( bjp tried to pressure RJD ) केलेले कृत्य भाजपच्या वर्मी लागले आहे. भाजपकडून होणाऱ्या आरोपांवर, टीकेवर आता जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी मोठ्या गौप्यस्फोट केला आहे. भाजपने आरजेडीच्या आमदारांना 2-3 दिवस थांबण्याची विनंती केली होती, असा दावा जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.
नितीश यांच्याशी युती करा, पण दोन-तीन दिवस थांबा -नितीश कुमार यांच्यामध्ये जोपर्यंत सहन करण्याची क्षमता होती तोपर्यंत त्यांनी सहन केले, असे भाजपवर प्रत्युत्तर देताना जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले. तसेच, भाजपचे नेते सुशील मोदी यांच्याविषयी बोलताना ते नितीश कुमार यांचे मित्र आहेत. त्यांच्याशी बोलून त्यांचे पुनर्वसन होते असेल तर आमचा काही आक्षेप नाही, असेही ललन सिंह म्हणाले. जेडीयूला कोणीही तोडू शकत नाही. हा प्रयत्न आरजेडीच्या वतीने भाजप करत होती. नितीश यांच्याशी युती करा, पण दोन-तीन दिवस थांबा, असे भाजपवाले आरजेडीच्या नेत्यांना फोन करून विनंती करत होते, असा दावा आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.
आम्ही ईडी, सीबीआयला घाबरत नाही - ललन सिंह यांनी ईडी-सीबीआयबद्दलही भाष्य केले. आम्हाला कोणतीही भीती वाटत नाही. आम्ही आमच्या पगारावर किंवा भाड्याने जगतो. ते आमचे आमदार फोडू शकणार नाहीत. त्यांची नजर आरजेडीच्या आमदारांवर होती. चार-पाच दिवस थांबा, असे सांगण्यात येत होते. जेडीयू पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांच्याकडे बोट दाखवत नितीश कुमार यांनी एकच एजंट ओळखला, अशी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा -raksha bandhan 2022 बिहारच्या सिवानमधल्या भैया बहिनी मंदिराची अद्भूत कथा