महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nitish Kumar : भर विधानसभेत नितीश कुमारांचं लज्जास्पद विधान; लोकसंख्या नियंत्रणाचा दिला फॉर्म्युला - बिहारमधील जातींच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल

Nitish Kumar : बिहारमध्ये लोकसंख्या नियंत्रित करण्याचं विधान करताना मुख्यमंत्री नितीश कुमार स्वतःवरच नियंत्रण ठेवण्यास विसरले. ते असं काही बोलले, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. वाचा सविस्तर..

Nitish Kumar
Nitish Kumar

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 9:07 PM IST

पाटणा Nitish Kumar :बिहारमधील जातींच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केल्यानंतर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सभागृहात लैंगिक शिक्षणाविषयी अत्यंत बेताल वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे बिहारमध्ये आता राजकीय खळबळ माजली आहे.

राजीनाम्याची मागणी : बिहारमध्ये लोकसंख्या नियंत्रित करण्याचं विधान करताना मुख्यमंत्री नितीश कुमार स्वतःवरच नियंत्रण ठेवण्यास विसरले. ते बरोबर बोलत होते, परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं सभागृहात आपलं मत मांडलं त्यामुळे वाद निर्माण झालाय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं हे विधान सभागृहाच्या कामकाजाचा भाग असूनही ते ऐकले जाऊ शकत नाही. नितीश यांच्या या विधानाला केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी विरोध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले नितीश कुमार : मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, 'जेव्हा एखाद्या पुरुषाचं लग्न होतं, तेव्हा तो रोज रात्री...त्यातूनच बाळाचा जन्म होतो. मात्र जेव्हा मुलगी शिकेलेली असेल तेव्हा म्हणेल...'. जेव्हा नितीश कुमार हे वक्तव्य देत होते, तेव्हा मागे बसलेले मंत्री हसत होते. नितीश कुमारांनी पत्रकारांना, माझा मुद्दा नीट समजून घ्या, असा सल्लाही दिला आहे. नितीश कुमार यांच्या या विधानाला केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी विवेकहीन म्हटलंय. नितीश कुमार यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांनी संपूर्ण मातृशक्तीचा अनादर केला. त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असं अश्विनी चौबे म्हणाले.

या आधीही वाद झाला आहे : लोकसंख्या नियंत्रणावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं हे काही पहिलं विधान नाही. यापूर्वीही त्यांनी जाहीर सभेत असंच वादग्रस्त विधान केलं होतं. त्या वक्तव्यावरूनही बिहारमध्ये मोठा गदारोळ झाला होता. मात्र आता लोकसंख्या नियंत्रणावर सभागृहात बोलताना नितीश कुमार ज्या पद्धतीनं नियंत्रणाबाहेर गेले, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

हेही वाचा :

  1. Ashok Choudhary On Amit Shah : बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर वादग्रस्त विधान
  2. ISRO Chief Autobiography : इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या आत्मचरित्रावरून वाद, प्रकाशन पुढे ढकललं

ABOUT THE AUTHOR

...view details