पाटणा -जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहाना यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. त्यांच्यासोबत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी दुसऱ्यांना बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला ( Cm Nitish Kumar Attacks Pm Narendra Modi ) आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शपथ घेतल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांवर निशाणा साधत विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे. नितीश कुमार म्हणाले की, पंतप्रधान मोदी 2014 मध्ये जिंकले. पण, आता त्यांनी 2024 ची काळजी करायला हवी. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे. मी 2024 साली पंतप्रधानपदाचा दावेदार नाही. नवीन सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, असा टोला नितीश कुमारांनी विरोधकांना लगावला आहे.