नवी दिल्ली :जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवला तर त्याला 500 रुपयांचे बक्षीस मिळणार ( Send Wrong Parking Photo Get 500 Rupees ) आहे. सरकार लवकरच तसा कायदा आणणार ( parking rules ) आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनधारकाला एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहोत.
गडकरी म्हणाले,मी असा कायदा आणणार आहे की, रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनाला एक हजार रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र काढून पाठवणाऱ्याला 500 रुपये दिले जातील. लोक त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा बनवत नाहीत, याबद्दल मंत्र्यांनी संताप व्यक्त केला. त्याऐवजी ते आपली वाहने रस्त्यावर उभी करतात.