नवी दिल्ली- युट्युबचा वापर करून अनेक युट्युबर पैसे कमवितात. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील मागे नाहीत. व्हिडिओ युट्युबवर अपलोड केल्यानंतर मिळणाऱ्या कमाईचा आकडाहीही केंद्रीय मंत्री गडकरींनी जाहीर केला आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेकांनी फावल्या वेळेचा उपयोग करून नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत. कोरोनाच्या काळात मंत्र्यांचे दौरेही थंडावले होते. अशा काळात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लॉकडाऊनमधील नवीन दोन गोष्टी केल्याची माहिती एका कार्यक्रमात सांगितली. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, कोरोनाच्या काळात घरामध्ये स्वयंपाक आणि विविध परिषदांमध्ये भाषण देण्यास सुरुवात केली. हे व्हिडिओ युट्युबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. आज मला युट्युब दर महिन्याला चार लाख रुपये देते.
हेही वाचा-मोदींच्या बर्थडेला मिळणार गिफ्ट? पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्याने होतील कमी?