हरिद्वार (उत्तराखंड) - केदारनाथ येथून कावड ( kavad yatra ) घेऊन हरिद्वारला घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्राच्या नितेश कांबळेने खिळ्यांनी बनवलेला चप्पल घातली ( Maharashtras Kanwar Nitesh Kamble wearing a nail kilt ) आहे. नितेश कांबळे हा गेल्या 8 महिन्यांपासून खिळ्यांनी बनवलेली चप्पल घालून कावड यात्रेत येथे फिरत आहे. ( Nitesh Kamble taking Kedarnath Kanwar from Haridwar )
निराहार करणार कावड यात्रा -त्याबाबत विचारले असता, महादेवाला खूश करणे हाच त्यांचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच मी ही कावड यात्रा करत आहे. या कावड यात्रेत आपण काहीही खाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. फलाहार आणि ज्यूस, पाणी यांच्या मदतीने ते ही कावड यात्रा करणार आहे. ही जिद्द अधिक कठीण करण्यासाठी त्यांनी खिळ्यांनी बनवलेला चप्पल घातली आहे. नितेश कांबळे सांगतो की, त्यांना लहानपणापासूनच भगवान भोलेनाथची पूजा करायला आवडते. याआधीही त्यांनी महाकालपर्यंत पायी प्रवास केला आहे.