पणजी - अर्थ मंत्रालयाने ( Ministry of Finance ) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या आयकॉनिक सप्ताहाचा समारोप समारंभ शनिवारी गोव्यात होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज गोवा दौऱ्यावर येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Nirmala Sitharaman ) यांच्या हस्ते ‘धरोहर’ - राष्ट्रीय सीमाशुल्क आणि वस्तू आणि सेवा कर संग्रहालयाचे होणार राष्ट्रार्पण आहे.
आयकॉनिक सप्ताहाचा समारोप - अर्थ मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताहाचा समारोप समारंभ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत शनिवारी गोव्यात होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी), महसूल विभाग, आर्थिक व्यवहार आणि आर्थिक सेवा विभागाद्वारे प्रदर्शित केल्या जाणार्या अनेक कार्यक्रमांचा समावेश असेल.