वॉशिंग्टन : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी (स्थानिक वेळेनुसार) जागतिक बँक गट आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर G20 बैठकींच्या 2023 च्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाल्या आहेत. यावेळी राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी त्यांचे स्वागत केले. सीतारामन आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. केंद्रीय अर्थमंत्री जगभरातील अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकर्सच्या बैठकींमध्ये सहभागी होतील. वॉशिंग्टन येथील आयएमएफच्या मुख्यालयात आज ही बैठक होणार आहे.
या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल : निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास 12 एप्रिल रोजी दुसऱ्या G-20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर बैठक, एफएमसीबीजीचे संयुक्त अध्यक्षस्थान करतील. G-20 सदस्यांव्यतिरिक्त विविध आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत जागतिक कर्ज असुरक्षा व्यवस्थापित करणे, बहुपक्षीय विकास बँकांना बळकट करणे, हवामानविषयक कारवाईसाठी वित्तसंकलन करणे आणि आंतरराष्ट्रीय कर आणि वित्तीय क्षेत्रातील समस्यांवरील प्रगतीला गती देणे यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.