महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Minor Girl Raped : उज्जैनमध्ये निर्भयासारखं बलात्काराचं प्रकरण, अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा - पोलीस अधीक्षक सचिन शर्मा

Minor Girl Raped : उज्जैनमध्ये दिल्लीतील निर्भयासारखं बलात्काराचं प्रकरण समोर आलं आहे. बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळून आल्या आहेत. अडीच तास ती अर्धनग्न अवस्थेत उज्जैनच्या रस्त्यावर फिरत होती. मुलीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हेगारांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी म्हणणं आहे.

Minor Girl Raped
Minor Girl Raped

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 5:39 PM IST

सचिन शर्मा यांची प्रतिक्रिया

उज्जैन Minor Girl Raped (उत्तर प्रदेश) :दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखेच एक प्रकरण उज्जैनमध्ये समोर आले आहे. बलात्कारानंतर नराधमांनी अल्पवयीन मुलीला अर्धनग्न अवस्थेत सोडलं होतं. बडनगर रोडवरील मुरलीपुरा परिसरात ती अडीच तास मदत मागत होती. मात्र तिला कोणीही मदत केली नाही. मुलगी प्रयागराजची रहिवासी आहे. ती उज्जैनला कशी पोहोचली याचा तपास सुरू आहे.

मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी :या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच महाकाल पोलिस स्टेशनने मुलीला रुग्णालयात दाखल करत तिची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय अहवालात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला इंदूरच्या रुग्णालयात रेफर करण्यात आलंय. या घटनेनं पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

प्रायव्हेट पार्टवरही गंभीर जखमा :महाकाल पोलिस स्टेशनचे प्रभारी अजय वर्मा यांनी सांगितलं की, सोमवारी मुरलीपुरा भागात एक अल्पवयीन मुलगी अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याची माहिती मिळाली. तिला तातडीनं पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. ती काहीच सांगण्याच्या स्थितीत नव्हती. तिचं मेडिकल केलं असता तिच्यावर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिच्या प्रायव्हेट पार्टवरही गंभीर जखमा होत्या. तिला तातडीनं इंदूरला उपचारासाठी पाठवण्यात आलं. अल्पवयीन मुलीकडून घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तिची भाषा कळत नाही. त्यामुळं पोलिसांना चौकशी करण्यात अडचण येत आहे.

तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना :अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी होताच पोलीस अधीक्षक सचिन शर्मा यांनी एसआयटी स्थापन केली. परिसरातील 400 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज पाहिल्यानंतर याप्रकरणी तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सचिन शर्मा म्हणाले की, निर्भयाच्या घटनेसारखी घटना निष्पाप मुलीवर झाली आहे. या प्रकरणी या घटनेचा तपास सुरू आहे.

आरोपींचा शोध सुरू : सिंहस्थ बायपास परिसरातून पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या अल्पवयीन मुलाचे कपडे रक्तानं माखल्याचं उघड झालं आहे. सिंहस्थ बायपास परिसर, मुरलीपुरा परिसरात ती हताश अवस्थेत फिरत होती. अल्पवयीन मुलगी उज्जैनची नव्हती, त्यामुळं तिला कोणत्याही क्षेत्राची माहिती नव्हती. तिनं काही लोकांशी बोलण्याचाही प्रयत्न केला, पण लोकांना तिची भाषा समजू शकली नाही. तपासादरम्यान ही अल्पवयीन उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी असल्याचं पोलिसांना समजलं. यापूर्वी ती कधीच उज्जैनला आली नव्हती. ही अल्पवयीन मुलगी उज्जैनला कशी पोहोचली हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे. तिच्यावर बलात्कार कोणी केला? हे अद्यापही स्पष्ट नाही.


हेही वाचा -

  1. Mumbai Girl Rape Case : आठ वर्षांच्या चिमुकलीवर 53 वर्षाच्या नराधमाचा अत्याचार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
  2. Nashik Crime : कांद्याच्या गोणीत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह; खून करुन मृतदेह फेकल्याचा पोलिसांना संशय
  3. Amravati Crime: विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी क्रीडा शिक्षकाच्या तक्रारीनंतर कथित पत्रकाराविरोधात गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details