महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PNB Fraud Case : नीरव मोदीच्या जवळच्या व्यक्तीला इजिप्तमध्ये अटक; सीबीआयची कारवाई - सीबीआयची इजिप्तमध्ये कारवाई

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणातीप मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या जवळच्या व्यक्तीला सीबीआयने अटक केल्याची माहिती पुढे आली आहे. सीबीआयच्या पथकाने ही कारवाई इजिप्त देशातील काईरो या शहरात केली. त्यानंतर आरोपी सुभाष शंकर याला मुंबई येथे आणण्यात आले आहे, अशी माहिती सीबीआय सुत्रांनी दिली आहे.

नीरव मोदी
नीरव मोदी

By

Published : Apr 12, 2022, 9:51 AM IST

Updated : Apr 12, 2022, 11:52 AM IST

मुंबई -पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा साथीदार सुभाष शंकर याला इजिप्तच्या कैरोहून भारतात परत आणण्यात यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीला भारतात आणण्यात अद्याप सीबीआयला यश आले नाही आहे. भारताकडून या दोन्ही आरोपींची विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील तयारी करण्यात आली होती.

नीरव मोदीसोबत गेला होता पळून- सीबीआय या आरोपीला मुंबईत आणल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात हजर करून त्याची सीबीआय कोठडी मागण्याची शक्यता आहे. या कारवाईत फरार उद्योगपती नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकर इजिप्तच्या कैरोहून भारतात परत आणण्यात यश आलं आहे. तो नीरव मोदीचा जवळचा सहकारी होता. त्याला देशात परत आणण्यासाठी सीबीआय अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होती. अखेर यात यश मिळालं. बँक फसवणूक प्रकरणातील हा एक आरोपी आहे. 49 वर्षीय सुभाष शंकर 2018 मध्ये नीरव मोदीसोबत भारतातून पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. नीरव मोदीचा हा सर्वात जवळचा सहकारी आहे. सुभाष शंकरला भारतात आणल्यानंतर सीबीआय आता सुभाष शंकरला मुंबई सत्र न्यायालयात हजर करणार आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी केली जाणार आहे.

इजिप्तमध्ये कारवाई - नीरव मोदीनं पीएनबी बँकेत सुमारे 6,500 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तो सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. ईडी नीरव मोदीच्या परदेशातील मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. नीरव मोदीनं 2017 मध्ये त्याच्या कंपनी फायरस्टार डायमंड्सद्वारे आयकॉनिक रिदम हाऊस इमारत खरेदी केली होती. त्याचे हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये रूपांतर करण्याची त्यांची योजना होती. पीएनबी घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून त्याने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयने इजिप्तच्या कैरोमध्ये मोठं ऑपरेशन केलं असून PNB घोटाळ्यातील सुभाष शंकर या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 49 वर्षीय सुभाष शंकर 2018 मध्ये नीरव मोदीसोबत भारतातून पळून गेल्याची माहिती आहे. नीरव मोदीचा हा सर्वात खास होता.

रेट कॉर्नर नोटीस - मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय आता सुभाषला मुंबई न्यायालयात आणणार असून PNB घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहे. 2018 मध्ये इंटरपोलने पीएनबी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या विनंतीवरुन नीरव मोदी त्याचा भाऊ विशाल मोदी आणि त्याचा जवळचा कर्मचारी सुभाष शंकर यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटिस जारी केली होती. चार वर्षांपूर्वी मुंबईच्या विशेष न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र आणि विशेष न्यायाधिश जे.सी जगदाळे यांनी जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे रेट कॉर्नर नोटिस जारी केली होती.

हेही वाचा -Kanhaiya Kumar : भाजपकडून रामाच्या नावाने देशामध्ये दंगली; कन्हैय्या कुमार यांचा घणाघात

Last Updated : Apr 12, 2022, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details