देहराडून :निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर आता कुंभमेळ्यातील १३ अखाड्यांपैकी पंचायती निरंजनी अखाड्याला जाग आली आहे. त्यांनी गुरुवारी १७ एप्रिलला कुंभमेळा संपणार असल्याची घोषणा केली आहे.
निरंजनी अखाड्याचे सचिव रविंद्र पुरी महाराज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की हरिद्वारमध्ये असलेल्या महामारीच्या परिस्थितीमुळे आम्ही १७ एप्रिलला कुंभ मेळा आटोपता घेण्याचा निर्णय घेतला आहे. २७ एप्रिलला होणाऱ्या शाही स्नानाबाबत अखाडा परिषद जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही पावलं उचलू. या चौथ्या शाही स्नानामध्ये काही साधू सहभागी होतील.
आचार्य महामंडलेश्वर कैलाश गिरी म्हणाले, की सध्याच्या परिस्थितीमध्ये हरिद्वारमध्ये एवढी गर्दी करणे योग्य नाही. कित्येक साधू आणि कर्मचारी तसेच भाविकही आजारी पडले आहेत.