हसनपल्ली (तेलंगणा) - निजामसागर येथील हसनपल्ली गेट येथे एका ऑटो ट्रॉलीला ट्रकची धडक बसली त्यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. ( Nine People Were Killed In Hasanpalli Accident ) ही घटना आज (दि. 9)रोजी सकाळी घडली. यातील सर्व लोक येल्लारेड्डी येथे एका कार्यक्रमाला गेले होत. तिथून परत येताना ही घटना घडली. दरम्यान, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख पटली आहे. अशी माहिती एसपी श्रीनिवास रेड्डी यांनी दिली आहे.
मृतांची नाव - अंजव्वा (35 वर्षे), पोशैया (60 वर्षे), गंगाव्वा (45 वर्षे), वीरामणी (35 वर्षे), लचाव्वा (60 वर्षे), सायव्वा (38 वर्षे), सायलू (35 वर्षे), इलाया (53 वर्षे) आणि वीरव्वा (70 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. येल्लारेड्डी येथील एका कार्यक्रमातून ते परतत असताना ही घटना घडली आहे.