बंगळुरू - कर्नाटक सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर उपायोजना करण्यास सुरुवात केली आहे. राज्यामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केरळ व महाराष्ट्राशी सीमा असलेल्या जिल्ह्यांमध्ये आठवडाखेर (Week End) संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती मुख्यमंत्री मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी माध्यमांनी दिली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी कोव्हिड व्यवस्थापनाबाबत मंत्री, कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा-VIDE पुरात पूल ओलांडण्याचे धाडस आले जीवावर, तरुणाने 'असे' वाचविले प्राण
महाराष्ट्र, केरळशी सीमा असलेल्या जिल्ह्यांमध्ये आठवडाखेर संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. रात्री 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत कर्नाटकमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बॅचप्रमाणे 23 ऑगस्टला शाळेमध्ये येण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन इतर वर्गांसाठी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
हेही वाचा-न्यायाधीशांच्या संरक्षणाकरिता सीबीआयने काहीही केले नाही- सर्वोच्च न्यायालय