श्रीनगर - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना टेरर फंडिंग प्रकरणी अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एनआयएच्या पथकाने रविवारी सकाळी अनंतनाग जिल्ह्यात छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 40 ठिकाणी एनआयएचे छापे टाकले आहेत. यामध्ये पोलिसांव्यतिरिक्त सीआरपीएफचेही सहकार्य घेतले जात आहे. कारवाई अद्याप सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने रविवारी केंद्रशासित प्रदेश जम्मू -काश्मीरमधील 40 ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यात श्रीनगर, गंदरबल, अचबल, शोपिया, बांदीपोरा, रामबन, दोडा, किश्तवाड, राजौरी आणि इतर जिल्ह्यांचा समावेश आहे. एनआयएचे हे छापे दहशतवादाला पुरवण्यात आलेल्या निधीसह इतर नवीन प्रकरणांशी संबंधित आहे. संबंधित ठिकाणांची कसून तपासणी केली जात आहे.