महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NIA Raid : एनआयएची शोपियान जिल्ह्यात छापेमारी मोहीम सुरू - NIA raid in Jammu and Kashmi

एनआयएने आज सकाळी दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे (NIA raid in Shopian district) टाकले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यातील रेबन चित्रगाम भागात आज सकाळपासून छापेमारी मोहीम सुरू (NIA raid in Jammu and Kashmir) झाली.

NIA Raid
राष्ट्रीय तपास यंत्रणा शोपियान जिल्ह्यात छापेमारी

By

Published : Oct 11, 2022, 9:43 AM IST

Updated : Oct 11, 2022, 11:04 AM IST

श्रीनगर :राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात छापे टाकत (NIA Raid) आहे. एनआयएने आज सकाळी दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे (NIA raid in Shopian district) टाकले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यातील रेबन चित्रगाम भागात आज सकाळपासून छापेमारी मोहीम सुरू (NIA raid in Jammu and Kashmir) झाली.

इतर जिल्ह्यांमध्येही छापेमारी सुरू :शनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले जे एका दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याच्या प्रकरणाशी संबंधित आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये एनआयएच्या एका मोठ्या कारवाईत, दहशतवादी निधीच्या चौकशीच्या संदर्भात जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये छापे टाकले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातील इतर जिल्ह्यांमध्येही छापेमारी सुरू राहणार आहे.

डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त :जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांसह राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पथके अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. 16 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूंछ, राजौरी, शोपियान, पुलवामा आणि जम्मू-काश्मीरमधील इतर जिल्ह्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.

Last Updated : Oct 11, 2022, 11:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details