महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NIA Raid: तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 30 ठिकाणी एनआयएचे छापे सुरू

तेलंगणातील निजामाबाद येथे कराटे प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादी प्रशिक्षण दिल्याप्रकरणी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये एनआयएचा शोध सुरू आहे. NIA raid 30 locations in Telangana Andhra Pradesh

NIA RAID CONTINUES AT 30 LOCATIONS IN TELANGANA ANDHRA PRADESH
NIA RAID CONTINUES AT 30 LOCATIONS IN TELANGANA ANDHRA PRADESH

By

Published : Sep 18, 2022, 12:24 PM IST

हैदराबाद:राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया-पीएफआय प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. तेलंगणातील निजामाबाद येथे कराटे प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादी प्रशिक्षण दिल्याप्रकरणी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये एनआयएचा शोध सुरू आहे. निजामाबाद, कुरनूल, गुंटूर जिल्ह्यात हा शोध सुरू आहे. जवळपास 30 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. NIA raid 30 locations in Telangana Andhra Pradesh

रविवारी पहाटे तेलंगणातील निजामाबादसह निर्मल जिल्ह्यातील भैंसा शहर आणि जगत्याला शहरामध्ये सुमारे 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अटक केलेल्यांसह अनेक संशयितांच्या घरांचीही तपासणी केली. छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. निर्मल जिल्ह्यातील भैंसामध्ये तपास अधिकाऱ्यांनी मदिना कॉलनीतील अनेक घरांची तपासणी केली. निजामाबादमध्ये झडती घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून ते तेथे पोहोचल्याचे समजते. अधिकारी भैंसामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांची चौकशी करत आहेत.

एनआयएच्या पथकाने जगत्याला शहरातही छापा टाकला. ते टॉवर सर्कल येथील केअर मेडिकल शॉपमध्ये आले. जिथे दुकानाचे कुलूप तोडताना स्थानिक महिलांनी त्यांना अडवले. अधिकाऱ्यांनी मालकाला बोलावून पाहणी केली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर आणखी काही घरांची झडती घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी संशयितांच्या घरातून अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील बुचिरेड्डीपलेम खाजा नगर येथे शोध घेतला जात आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती गोळा करण्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुचिरेड्डीपालम येथील इलियास आणि त्याच्या मित्रांच्या घरांवर छापे टाकण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details