वॉशिंग्ट:Elon Musk , Twitter: ट्विटरचा पदभार स्वीकारल्यावर एलॉन मस्क काही ना काही घोषणा करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यांपासून ते छाटणीपर्यंतची सर्व गोष्टी कंपनीत सुरू आहेत. यावरून मस्क यांच्यावर देखील टीका केली जात आहे, पण एलॉन मस्क हे स्वतःच्या पद्धतीने कंपनी चालवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. दरम्यान, मस्क यांनी शनिवारी ट्विटरवर कंटेंट मॉडरेशन (Content Moderation) संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्विटरच्या नवीन धोरणात युजर्सना मत मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, पण त्या विचारांच्या Reach बाबतचे स्वातंत्र्य नसेल. मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर मस्क यांनी ही घोषणा केली आहे.
अल्टिमेटमनंतर ट्विटर कार्यालये बंद:मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे नव्याने जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रावर त्यांची सहमती दर्शवण्यास सांगितली आहे. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ( 5 pm ET ) कर्मचाऱ्यांना आपली प्रतिक्रिया नोंदवण्यास सांगण्यात आली. बुधवारी एलॉन मस्क यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर ट्विटर कार्यालये बंद होत आहेत. आणि कर्मचारी मोठ्या संख्येने निघून जाणार आहेत. मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचार्यांना कंपनीत अत्यंत कठोर नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे. ज्यात कामाचे तास काही असतील.
कर्मचाऱ्यांना कामावरून काढले: या कर्मचाऱ्यांना हे मंजूर नसेल तर कर्मचारी राजीनामा देऊ शकतात. मस्क यांनी या नव्या प्रतिज्ञापत्रावर गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना स्वाक्षरी करण्यास सांगितली आहे. या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार आहे. त्यांना 3 महिन्यांचा पगार कंपनीकडून देण्यात येईल, अशी माहिती वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार समोर येत आहे. बुधवारी ट्विटर कर्मचाऱ्यांना मस्क यांनी ईमेल पाठवला होता.
3 महिन्याचा पगार देईल: ईमेलमध्ये सांगण्यात आले आहे की, पुढे जाण्यासाठी, एक यशस्वी ट्विटर 2.0 तयार करण्यासाठी आणि वाढत्या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्याकरिता, आम्हाला अत्यंत स्पर्धात्मक असणे आवश्यक राहणार आहे. या ईमेलमध्ये कर्मचाऱ्यांना 'हो' किंवा 'नाही' या पर्यायाची निवड करण्यास सांगण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी हो असं उत्तर दिलेलं नाही. या कर्मचाऱ्यांचा राजीनामा मंजूर करत कंपनी त्यांना 3 महिन्याचा पगार देईल, असंही ईमेलमध्ये सांगण्यात आले आहे. या अल्टिमेटम आधी आणि नंतर ट्विटरच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले. यानंतर ट्विटर कंपनीने ईमेलद्वारे घोषणा केली की, कंपनीच्या कार्यालयीन इमारती सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात येतील. सोमवारपर्यंत ट्विटर कंपनी राजीनामा दिलेल्या कर्मचारी इमारतीतील प्रवेशासाठी असलेल्या बॅजची परवानगी काढून टाकणार आहे.
बनावट खात्यांसाठी कठोर पाऊल: Twitter नवीन खात्यांना ९० दिवसांसाठी ब्लू सबस्क्रिप्शन सेवा खरेदी करण्याची परवानगी देणार नाही. द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, याचा अर्थ युजर्स नवीन अकाउंट व्हेरिफाय करू शकणार नाहीत. घोटाळे आणि बनावट खात्यांची शक्यता कमी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. अहवालानुसार, जुन्या प्लॅनमध्ये प्रतीक्षा कालावधीचा उल्लेख नव्हता, परंतु 9 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यानंतर तयार केलेली Twitter खाती यावेळी Twitter Blue चे सदस्यत्व घेऊ शकणार नाहीत असे स्पष्ट संकेत आहेत. नवीन ट्विटर ब्लू पेज म्हणते की प्लॅटफॉर्म भविष्यात कोणत्याही सूचना न देता नवीन खात्यांसाठी प्रतीक्षा कालावधी लागू करू शकते.