चेन्नई :कोईम्बतूर शहरातील एका कारमध्ये झालेल्या सिलेंडर बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएने तीन राज्यात छापेमारी केली आहे. 23 ऑक्टोंबरला कोईम्बतूर शहरात हा बॉम्बस्फोट घडवून आणला गेला होता. या प्रकरणी एनआयएने तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये छापेमारी केली आहे. एनआयएने तब्बल 60 ठिकाणांवर छापेमारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर झाला होता स्फोट :कोईम्बतूर शहरातील कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर 23 ऑक्टोंबरला कारमध्ये सिलेंडर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात बंदी घातलेल्या इसीस या संघटनेशी संबंधित असलेल्या जमेशा मोबीन या तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभर खळबळ उडाली होती. त्यानंतर हे प्रकरण तामिळनाडूच्या पोलीस दलाकडे सोपवण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे प्रकरण सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आले. मात्र संवेदनशील प्रकरण असल्याने एनआयएकडे या सिलेंडर स्फोटाचा तपास देण्यात आला. इसीसशी संबंधित असलेल्या जमेशा मुबीन याचा या स्फोटात संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने याबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत.
धार्मीक ठिकाणांवर आत्महघातकी हल्ला :कोईम्बतूर शहरातील कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर 23 ऑक्टोंबरला कारमध्ये सिलेंडर बॉम्बस्फोट झाला होता. हा स्फोट आत्मघातकी हल्ला असल्याचे एनआयए तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी एनआयएने तीन राज्यातील 60 ठिकाणी छापेमाीर केली आहे. या ठिकाणावरुन एनआयएने काही महत्वाचे कागदपत्र हाती लागले आहेत. यातून कोईम्बतूर येथे झालेला स्फोट हा आत्महघातकी हल्ला असल्याचे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा स्फोट घडवून आणण्यासाठी संशयीतांनी स्फोटके आणि साहित्य ऑनलाईन विकत घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.