महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दोन संशयित दशतवाद्यांविरोधात एनआयएकडून आरोपपत्र दाखल - लष्कर-ए-तोयबा लेटेस्ट न्यूज

लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेच्या (एलआयटी) दोन संशयित दशतवाद्यांविरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले आहे. डॉ. सबील अहमद आणि असदुल्ला खान अशी त्यांनी नावे आहेत.

एनआयए
एनआयए

By

Published : Feb 22, 2021, 6:54 PM IST

बंगळुरू - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेच्या (एलआयटी) दोन संशयित दशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीसह देशभरात तोडफोडीच्या घटना केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

हैदराबाद रहिवासी असदुल्ला खान अबू सुफ्यान आणि बेंगळुरू येथील रहिवासी डॉ. सबील अहमद यांच्याविरोधात बंगळूरमधील एनआयएच्या विशेष कोर्टाने आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींवर बंगळुरू, हुबळी, नांदेड, तेलंगणा आणि हैदराबादसह देशातील अनेक शहरांमध्ये हिंदू नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला होता.

ताब्यात घेतलेले डॉ. सबील अहमद आणि असदुल्ला खान लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. तसेच आरोपींचा विविध गुन्ह्यांमध्ये सामील होता. इतर आरोपींबरोबरच त्यांनीही अनेक हिंसक कार्यात भाग घेतल्याचा आरोप आहे.

यापूर्वी एनआयएने 17 आरोपींना अटक केली होती आणि त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. 2016 मध्ये कोर्टाने यातील 13 आरोपींना पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. तर उर्वरित पाच आरोपींवर खटला सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details