जम्मू काश्मीर : द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेच्या अटक सदस्याविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (National Investigation Agency) पुरवणी आरोपपत्र दाखल केले. TRF ही पाकिस्तानस्थित दहशतवादी गट ( Terror Groups ) लष्कर-ए-तैयबा (LeT) ची शाखा आहे.
Terror Groups : एनआयएने टीआरएफ दहशतवाद्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र केले दाखल - National Investigation Agency
बारामुल्ला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुझमिल मुश्ताकविरुद्ध नवी दिल्लीतील विशेष एनआयए ( National Investigation Agency ) न्यायालयात विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ( Terror Groups )
![Terror Groups : एनआयएने टीआरएफ दहशतवाद्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र केले दाखल NIA](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16884958-thumbnail-3x2-nia.jpg)
विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल : एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुझमिल मुश्ताक भट्ट उर्फ हमजा उर्फ दानियाल याच्याविरुद्ध नवी दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयात विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आयईडी बनवण्यातही केली मदत :याप्रकरणी गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रवक्त्याने सांगितले की, तपासात आरोपी मुझमिलचे पाकिस्तानस्थित लष्कर आणि टीआरएफच्या नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.आरोपींनी तरुणांना काश्मीरमधील टीआरएफ या दहशतवादी गटात सामील होण्यासाठी प्रवृत्त केले होते. याशिवाय खोऱ्यात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांसोबत आरोपींनी तरुणांना आयईडी बनवण्यातही मदत केली होती. आरोपींनी दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवली आणि त्यांना पैसेही पुरवले.