नवी दिल्ली -राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष (निवृत्त न्यायाधीश) अरुण मिश्रा यांनी निवडणुकीनंतर झालेल्या पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षांनी इंटेल ब्युरोचे माजी अध्यक्ष राजीव जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एनएचआरसी समिती ही पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचा तपास करणार आहे. समितीला तातडीने चौकशी करण्याचे निवृत्त न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी आदेश दिले आहेत.
समितीमध्ये हे असणार सदस्य-
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने नेमलेल्या समितीत राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष अतिफ रशीद, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य राजूबेन एल. देसाई, एनएचआरसीचे (तपास) महासंचालक संतोष मिश्रा, पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगाचे प्रबंधक प्रदीप कुमार पंजा, पश्चिम बंगाल राज्य कायदे सेवा प्राधिकरणाचे सचिव राजू मुखर्जी आणि एनएचआरसीचे डीआयजी (तपास) मन्झील सैनी यांचा समावेश आहे.