- मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद
मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद
मुंबई - मुंबईत लसीकरण मोहीम सुरू असून सतत लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद ठेवावे लागते आहे. तसेच कमी लसीकरण केंद्रांवर लस द्यावी लागत आहे. गुरुवारी लसीचा तुटवडा असल्याने काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने शुक्रवारी ९ जुलैला पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
- इग्नुमधील परीक्षा फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस
इग्नुमधील परीक्षा फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील टर्म एंड एक्झामिनेशन (टीईई) 2021 ची तारीख जाहीर झाली आहे. 3 ऑगस्टपासून या परिक्षेला सुरुवात होणार आहे. या, परिक्षेचा अर्ज करण्यासाठी जी मुदतवाढ देण्यात आली होती, तिचा आज शेवटचा दिवस आहे.
- आजपासून 15 जुलैपर्यंत उत्तराखंडमध्ये पाऊस
आजपासून 15 जुलैपर्यंत उत्तराखंडमध्ये पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 जुलै ते 15 जुलैपर्यंत उत्तराखंडमध्ये पाऊस आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे पहाडी भागात भूस्खलन सारखी घटना होऊ शकते. यामुळे लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- हिमाचल प्रदेशमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा आजपासून
हिमाचल प्रदेशमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा आजपासून
हिमाचल प्रदेशमध्ये आजपासून शिक्षक पात्रता परीक्षा सुरू होत आहे. ही परीक्षा 12 जुलैपर्यंत चालणार आहे.
- कोलकाता विद्यापीठ सेमेस्टर परीक्षा प्रक्रिया आजपासून सुरू
कोलकाता विद्यापीठाच्या सेमेस्टर परिक्षेच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात होत आहे. कोलकाता विद्यापीठ हे प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. गुरूदेव रविंद्रनाथ टागोर, नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. कोलकाता विद्यापीठ हे आशियातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे.
कोलकाता विद्यापीठ सेमेस्टर परीक्षा प्रक्रिया आजपासून सुरू - परराष्ट्रमंत्री 9-10 जुलै दोन दिवसीय जॉर्जिया दौऱ्यावर
परराष्ट्रमंत्री 9-10 जुलै दोन दिवसीय जॉर्जिया दौऱ्यावर
नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे दोन दिवसीय जॉर्जिया दौऱ्यावर जाणार आहेत. 9-10 जुलै या असा दौन दिवसीय त्यांचा जॉर्जिया दौरा असणार आहे. जॉर्जियाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री डेविड झलकालीयानी यांच्या निमंत्रणावरुन ते जॉर्जियाला भेट देतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली.
- सुखबीर सिंह बादल यांचा आज जन्मदिवस
सुखबीर सिंह बादल यांचा आज जन्मदिवस
शिरोमणी अकाली दलचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 9 जुलै 1962मध्ये झाला आहे. सध्या ते फिरोजपूर या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.