- एकनाथ खडसे यांना ईडीने बजावले समन्स; आज हजर व्हावे लागणार एकनाथ खडसे यांना ईडीने बजावले समन्स; आज हजर व्हावे लागणार
मुंबई - भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयने (ईडी) समन्स बजावला. ईडीकडून खडसे यांना आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे इथल्या भोसरी भागातील जमीन घोटाळ्याप्रकरणी बुधवारी एकनाथ खडसे यांना ईडीकडून एक धक्का देण्यात आला. ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला.
- नाशिक : स्मार्ट बस सेवेच्या ड्रीम प्रोजेक्ट्सचे आज उद्घाटन नाशिक : स्मार्ट बस सेवेच्या ड्रीम प्रोजेक्ट्सचे आज उद्घाटन
नाशिकच्या बहुचर्चित वादात सापडलेल्या स्मार्ट बस सेवेच्या ड्रीम प्रोजेक्ट्सला अखेर आजचा उद्घाटनाचा मुहूर्त मिळाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. गेल्या कित्यक दिवसांपासून हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात होता.
- दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रश्नावर ट्विटरला उत्तर देण्याचा आज शेवटचा दिवस दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रश्नावर ट्विटरला उत्तर देण्याचा आज शेवटचा दिवस
केंद्र सरकारकडून नवीन माहिती आणि तंत्रज्ञान कायदे लागू करण्यात आले आहे. या नवीन कायद्यांतर्गत ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निवासी तक्रार अधिकाऱ्याची निवड करावे लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत ट्विटर तक्रार अधिकाऱ्याची नियु्क्ती कधी करणार आहात, हे विचारले होते. ट्विटरला याबाबत आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.
- स्वच्छ आंध्रप्रदेश योजना आज लाँच होणार स्वच्छ आंध्रप्रदेश योजना आज लाँच होणार
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर राजशेखर रेड्डी यांचा आज जन्मदिवस आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी 'स्वच्छ आंध्रप्रदेश' ही योजना लाँच करणार आहेत.
- एअर इंडियाच्या प्रॉपर्टीवर आज लागणार बोली एअर इंडियाच्या प्रॉपर्टीवर आज लागणार बोली