- महागाई विरोधात काँग्रेसचे मुंबईत आंदोलन
मुंबई - केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे कठीण झाले आहे. या जीवघेण्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसकडून ७ जुलै ते १७ जुलै २०२१ या कालावधीत मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.
महागाई विरोधात काँग्रेसचे मुंबईत आंदोलन - मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार -
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधासभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्षाच्या मुख्य कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती भाजप नेते माधव भंडारी यांनी दिली.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार - केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार होण्याची शक्यता
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सुरुवातीला 8 जुलैला सायंकाळी विस्तार होणार असल्याची चर्चा होती. सुत्राच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला सायंकाळी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार होण्याची शक्यता - बिर्ला इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस
बिर्ला विज्ञान आणि तंत्रज्ञान इन्स्टिट्यूटमधील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज (बुधवारी) सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थी www.bitsadmission.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. याआधी शेवटची तारीख 30 जून होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
बिर्ला इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस - आसाम : 7 जिल्ह्यांमध्ये आजपासून लॉकडाऊन
गुवाहटी : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मात्र, तेच आसाममधील काही जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाही आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. गोलपारा, गोलाघाट, जोरहाट, लखीमपुर, सोनितपुर, विश्वनाथ आणि मोरीगांव या सात जिल्ह्यात हे लॉकडाऊन करण्यात आले आहे.
आसाम : 7 जिल्ह्यांमध्ये आजपासून लॉकडाऊन - उत्तर प्रदेश : आयटी महाविद्यालयात पदव्यत्तर प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू
लखनऊ - येथील आयटी महाविद्यालयात पदव्यत्तर प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.
उत्तर प्रदेश : आयटी महाविद्यालयात पदव्यत्तर प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू - नोकिया जी 20चे प्री बुकिंग आजपासून सुरू होणार
नोकिया जी-20 स्मार्टफोनसाठी प्री बुकिंग आजपासून सुरू होणार आहे. जवळपास 12,999 पासून या स्मार्टफोन बाजारात पाहायला मिळेल.
नोकिया जी 20चे प्री बुकिंग आजपासून सुरू होणार - Superphone Mi 11 Ultra 7 जुलैला होणार लाँच; जाणून घ्या, वैशिष्ट्ये
नवी दिल्ली - एमआय इंडियाचा एमआय 11 अल्ट्रा भारतात 7 जुलैला दुपारी 12 नंतर ग्राहकांकरिता उपलब्ध होणार आहे. ही माहिती एमआय इंडियाने दिली आहे.एमआय 11 अल्ट्राची 69,990 रुपये किंमत आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे या स्मार्टफोनचे लाँचिंग होण्यास उशीर झाला आहे. ग्राहकांना एमआय डॉट कॉमवरून अल्ट्रा गिफ्ट कार्ड हे 1,999 रुपयांना खरेदी करावे लागणार आहे. ही रक्कम एमआय अल्ट्राच्या खरेदीनंतर परत मिळणार आहे. त्यासोबत ग्राहकांना बोनस आणि दोन वेळा मोफत स्क्रीन बदलून मिळणार आहे.
Superphone Mi 11 Ultra 7 जुलैला होणार लाँच; जाणून घ्या, वैशिष्ट्ये - फरारी रोमा आज भारतात लाँच होणार
फरारी रोमा कार आज भारतात लाँच होणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, यातील 70 टक्के पार्ट्स हे पूर्णपणे नवीन आहेत.
फरारी रोमा आज भारतात लाँच होणार - #Happy Birthday Mahi : क्रिकेटमधील 'चाणक्य' महेंद्रसिंह धोनीचे 40व्या वर्षात पदार्पण
दराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असा ज्याचा लौकिक आहे तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी उर्फ माही. कॅप्टन कुल धोनीला 'हेलिकॉप्टर शॉट'चा जनक म्हणून ओळखले जाते. कर्णधार, फलंदाज, यष्टीरक्षक यातील त्याच्या यशस्वी कामगिरीमुळे धोनी कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला. आज त्याचा 40वा वाढदिवस आहे. धोनीने भारतासाठी 15 वर्षांहून अधिक काळ क्रिकेटचे सामने खेळले. तो एकेकाळी आईसीसी रँकिंगमध्ये काही वर्षांपर्यंत एकदिवसीय (वनडे) क्रिकेटमध्ये सर्वोकृष्ट फलंदाजही होता. धोनीला जागतिक क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ फिनिशर म्हणूनही ओळखले जाते.. इतकेच नव्हे टी-20 वर्ल्डकप, एकदिवसीय वर्ल्डकप, ऑस्ट्रेलियातील मालिकाविजय, चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद, कसोटीत प्रथमच प्रथम क्रमांकाचा संघ होणे इत्यादी गोष्टीत त्याचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही.
#Happy Birthday Mahi : क्रिकेटमधील 'चाणक्य' महेंद्रसिंह धोनीचे 40व्या वर्षात पदार्पण