महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर

या घडामोडींवर असणार खास नजर

newstoday-17-july-2021-etv-bharat
NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर

By

Published : Jul 17, 2021, 5:17 AM IST

Updated : Jul 17, 2021, 5:49 AM IST

  • सबरीमाला मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं

केरळमधील सबरीमाला मंदिर आजपासून पुढील ५ दिवस भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.

  • प्रियंका गांधीचा यूपी दौरा

प्रियंका गांधी यूपी दौऱ्यावर असून आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी प्रियंका गांधी यांनी लखनौचा दौरा केला होता. या दौऱ्यात प्रियंका यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

  • गृहमंत्री आमित शाह आज शिलांगमध्ये

सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री सामिल होणार आहे. यात ते अधिकाऱ्यांचा सन्मान तसेच रुस्तमजी स्मृती व्याख्यान देखील देणार आहेत. हा कार्यक्रम शिलांगमध्ये होणार आहे.

  • सचिन पायलट यांची पत्रकार परिषद

केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ निर्णयाविरोधात काँग्रेसकडून ७ ते १७ जुलै या दरम्यान, आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर आज उत्तराखंड काँग्रेस मुख्यालयात सचिन पायलट यांची पत्रकार परिषद होणार आहे.

  • पंढरपुरात आजपासून एसटी, खाजगी वाहनांना नो एन्ट्री

आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरात एसटी, खाजगी बस सेवा 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आले आहे. याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

  • आदिती तटकरेंचा संवाद

राज्यमंत्री आदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'महाराष्ट्रवादी चर्चा' या उपक्रमाद्वारे आज सकाळी १० वाजता पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

  • राज ठाकरेंचा नाशिक दौरा -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहे. आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत.

  • वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया ५वा टी-२० सामना

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना आज खेळला जाणार आहे.

  • टोकियो ऑलिम्पिकसाठी खेळाडू होणार रवाना

आज भारतीय बॉक्सिंगपटू जे इटलीमध्ये सराव करत होते. ते इटलीहून आज टोकियोसाठी रवाना होणार आहेत.

Last Updated : Jul 17, 2021, 5:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details