महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर - narendra modi

या घडामोडींवर असणार खास नजर

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/15-July-2021/12462177_kkkkkkkkkk.jpg
NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर

By

Published : Jul 15, 2021, 4:32 AM IST

Updated : Jul 15, 2021, 4:58 AM IST

  • कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून होणार सुरू

राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून(१५ जुलै) सुरू होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा शासन निर्णय ५ जुलैला जारी केला होता. त्यानुसार, कोरोनामुक्त ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या परिसरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून म्हणजे आजपासून सुरू होणार आहेत.

  • नाना पटोले आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार

काँग्रेसकडून इंधन दरवाढीविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. पटोले आज हॅगिंग गार्डनपासून सायकलवर राजभवनावर जाणार आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीमध्ये विविध योजनेचे उद्घाटन करणार आहेत. यात ते दुपारी १२ वाजता इटरनॅशनल को ऑपरेशन अॅन्ड कन्वेंशन सेंटरचे उद्घाटन करणार आहेत.

  • पिल्लई आज घेणार राज्यपालपदाची शपथ

पी. एस. श्रीधरन पिल्लई आज गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेणार आहेत. सकाळी ११ वाजता राजभवनवर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

  • राज्य कर्मचाऱ्यांचे आज आंदोलन

नोकरभरतीसह इतर मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने, राज्यभर काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सेवेतील सुमारे दोन लाख पदे रिक्त असून त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना समस्यांना समोरे जावे लागत असल्याचे, संघटनेचे म्हणणे आहे.

  • वस्तू व सेवाकर अधिकाऱ्यांचे आज आंदोलन -

वस्तू व सेवाकर विभागात ४० टक्के जागा रिक्त असल्याने त्याचा थेट परिणाम कर संकलनावर होत आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व राज्यकर अधिकारी आज काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

  • आज पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप 2021 साठी अर्ज भरले जात असून आज या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत आहे. आतापर्यंत 37 लाख 23 हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत.

  • धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे.

  • वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा टी-२० सामना

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्याच्या टी-२० मालिकेतील आज चौथा सामना खेळला जाणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजने पहिले तीनही सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे.

Last Updated : Jul 15, 2021, 4:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details